विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज (ता.२६) बारामती व इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी अडीच वाजता ते बारामतीत नीरा नदीचे प्रदूषण पाहणार आहेत.
बावनकुळे हे शिरवली येथील निरा नदीच्या बंधाऱ्यावरून निरा नदीतील प्रदूषणाची माहिती घेणार आहेत. यानंतर ते इंदापूरकडे रवाना होतील. इंदापूर तालु्क्यातील भाजप व युवा वॉरियर्स च्या वतीने ५२ शाखांचे उदघाटन ते करणार आहेत. निरा नदीमध्ये आजूबाजूचे कारखाने सांडपाणी सोडत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे, त्यावर बावनकुळे काय बोलतात याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे.
संध्याकाळी इंदापूर नगरपरीषदेसमोरील प्रांगणात बावनकुळे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत बावनकुळे नेमके काय बोलतात याची उत्सुकता आहे.