बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या 500 वर पोचलेली असतानाच बारामतीत शून्यावर आलेली कोरोनाची रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. बारामती मध्ये कोरोनाची रुग्णसंख्या १३वर पोचली असून यामध्ये शहरातील ४ तर ग्रामीण भागातील ९ रुग्णांची संख्या समाविष्ट आहे.
तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनीही याला दुजोरा दिला असून डॉ. खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या शहरांमध्ये चार रुग्ण ऍक्टिव्ह असून तालुक्यामध्ये नऊ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
सध्या देशभरात पुन्हा एकदा प्रतिकूल हवामानामुळे व सतत बदलत चाललेल्या परिस्थितीमुळे कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्याचे परिणाम आता तालुकास्तरापर्यंत दिसू लागले असून, परवापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुगसंख्या 496 एवढी होती. ती आता वाढलेली असून, बारामती तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण दिसू लागले आहेत.
पूर्ण कोरोनामुक्त झालेल्या बारामती तालुक्यात नव्याने कोरोनाचे रुग्ण दिसू लागल्याने आता सावधानता बाळगण्याची गरज आहे.