दिल्ली – महान्यूज लाईव्ह
देशातील खासदारांच्या कामगिरीवरून गेट वे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक या संस्थेमार्फत ही टॉप टेन यादी जाहीर केली जाते, त्यामध्ये कामगिरींचे मुल्यमापन करून अहवाल तयार केला जातो. त्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ४ खासदारांचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये अर्थातच सुप्रिया सुळे पहिल्या क्रमांकावर असून श्रीरंग बारणे दुसऱ्या, श्रीकांत शिंदे आठव्या तर राहूल शेवाळे नवव्या क्रमांकावर आहेत. सुप्रिया सुळे यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून अनेकदा गौरविण्यात आले आहे. सन २०१६ ते २०१९ पर्यंत त्या संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या असून त्यांना संसदरत्न पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
पहिल्या दहा खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक चार, तामिळनाडूतील दोन, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, अंदमान व निकोबार येथील प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.
या दहा खासदारांमध्ये महाराष्ट्राव्यतिरिक्त तामिळनाडूतील सेंथीलकुमार एस आणि धनुष एस कुमार यांचा समावेश आहे, राजस्थानचे पी.पी. चौधरी, उत्तर प्रदेशचे पुष्पेंद्रसिंह चंदेल, अंदमान आणि निकोबार येथील कुलदिप रायशर्मा आणि झारखंडमधील विद्युत बरनमहतो यांचा समावेश आहे.