दिल्ली : महान्यूज लाईव्ह
चोरांचे आडनाव मोदी असेच का असते असा सवाल चार वर्षांपूर्वी एका सभेत राहुल गांधी यांनी केला होता. त्या प्रकरणांमध्ये भाजपचे तत्कालीन कार्यकर्ते व सध्याचे आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण जगभरातील मोदी आडनावाच्या लोकांचा अवमान व मानहानी झाल्याचा दावा त्यांनी केला होता.
सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. मानहानीच्या खटल्यामध्ये सुरत कोर्टाने राहुल गांधींना ही शिक्षा सुनावली होती आणि त्यांना जामीनही मंजूर केला होता. मात्र दोन वर्षाची शिक्षा झाल्याचे कारण सांगून लोकसभा सचिवालयाने गांधींची खासदारकी रद्द केली आहे.
राहुल गांधी यांनी एका सभेमध्ये चोरांचे नाव मोदी असेच का असते अशा स्वरूपाचे विधान केले होते त्यावरून मानहानीचा खटला सुरतच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. सुरतच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने या निकालामध्ये गांधी यांच्या विरोधात दोन वर्षाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे यावेळी स्वतः राहुल गांधी न्यायालयात हजर होते.
महाराष्ट्रातही निकालाचे पडसाद! विरोधकांचा सभात्याग!
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. विरोधकांनी व विरोधी पक्षांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. दरम्यान या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्राचे उमटले विधिमंडळात विरोधकांनी या निर्णयाचा निषेध करत सभात्याग केला.