बारामती – महान्यूज लाईव्ह
बांधकाम व्यावसायिकांच्या बारामतीतील क्रेडाई संस्थेच्या अध्यक्षपदी राहूल खाटमोडे तर सचिवपदी अमोल कावळे यांची निवड करण्यात आली आहे.
क्रेडाई संस्थेचे मावळते अध्यक्ष सुरेंद्र भोईटे यांनी ही माहिती दिली. क्रेडाई बारामतीची सन २०२१ ते २३ या कालावधीतील ७ वी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत २०२३ ते २५ या कालावधीची क्रेडाईची नवी कार्यकारीणी निवडण्यात आली.
यामध्ये राहूल खाटमोडे यांची अध्यक्षपदी, सिध्दार्थ जाचक यांची उपाध्यक्षपदी, राजेंद्र खराडे यांची खजिनदारपदी, जावेद सय्यद यांची सहसचिवपदी तर अविनाश सातव यांची युवा समन्वयकपदी निवड करण्यात आली.