मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या राजगर्जनेत शिवसेनाच्या फुटीपासून ते पक्ष संपलेल्या मनसेवरील टिकेपर्यंत आणि माहिमच्या समुद्रापासून ते भोंग्यापर्यंत बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठवतानाच एकनाथ शिंदे यांना कानपिचक्या दिल्या.
ते म्हणाले, महाराष्ट्रात बरेच काही घडते आहे. मुख्यमंत्री तुमच्याकडे धनुष्यबाण आणि शिवसेना आली आहे, तुम्ही एकतर मशिदीवरचे भोंगे बंद करा.. नाहीतर आमच्याकडे दुर्लक्ष करा..
अख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवीन. कोणाची परत वाकडी हिंमत होणार नाही. कोणीही यावं आम्हाला टपली मारून जावं, तुमच्या डोळ्यादेखत या गोष्टी घडताहेत, तुमचे लक्षश्र नाही. राजकारणात तुम्ही गुंतला आहात. म्हणून तुमची ताकद सतत दाखवावीच लागेल.
यावेळी राज ठाकरे यांनी माहिम येथे समुद्रात बेकायदेशीरपणे उभारल्या जात असलेल्या दर्ग्याचे ड्रोन व्हिडीओ सभेत दाखवले. ते म्हणाले. माहिमजवळ नवा हाजी अली बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अडीच वर्षापासून याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे दर्गा उभारण्याचे काम सुरू आहे, ते उध्वस्त झाले नाही, तर शेजारीच आम्ही गणपतीचे मोठे मंदिर उभे करू.
ते म्हणाले, बाळासाहेबांशिवाय धनुष्यबाण कोणाला पेलवणार नाही. शिवसेनाप्रमुख होणे माझ्या मनातही नव्हते. मी उध्दव यांना विचारले होते, हे सांगतानाच त्यांनी मनसे स्थापन करण्यामागचा उद्देश त्यांनी सांगत भूतकाळातील साऱ्याच घटनांना राज ठाकरे यांनी उजाळा दिला.
मी शिवसेना पाहिली नाही, जगलो. उध्दव ठाकरे यांनाच कंटाळून अलिबाबा आणि त्यांचे ३५ कंटाळून गेले. महाराष्ट्रातून सूरतला लुट घेऊन गेलेले हे पहिलेच. महाराजांनी सूरत लुटून महाराष्ट्रात आणली होती अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली.
कोर्टावरती अलंबून असणारे सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. आताची राजकीय परिस्थिती पाहता सर्वांनी टरवा आणि विधानसभेच्या निवडणूका आताच लावा, जो काही सोक्षमोङक्ष व्गहायचा तो आताच होईल. जो काही चिखल केला आहे, तो नागरिकांनी तुमच्या तोंडात नाही घातला तर बघा अशा शब्दा्ंत त्यांनी टिका केली.