परभणी – महान्यूज लाईव्ह
गेल्या आठवड्यात अवकाळीने विदर्भाला झोडपले.. अनेक शेतकरी काळाच्या संकटाने उध्वस्त झाले.. त्याचबरोबर परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील उखळी खुर्द येथे शेतात काम करताना अचानक वीज कोसळली आणि दोघांचा मृत्यू झाला.
गारपीठ सुरू झाल्याने त्यांनी बाभळीच्या झाडाचा आडोसा घेतला आणि इथेच घात झाला. बाभळीच्याच झाडावर वीज कोसळली आणि त्यात बाळासाहेब बाबुराव फड (वय ४५ वर्षे व जयंत गंगाराम नागरगोजे यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
सोनपेठ तालुक्यातीलच उखळी बुद्रूक येथील नीता गणेश सावंत या ३५ वर्षीय महिलेचाही वीज कोसळून मृत्यू झाला. शेतात ज्वारीचे खळे तयार करताना वीज कोसळली. पूर्णा तालुक्यातही वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.
परभणी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे दुपारच्या वेळी ओंकार भागवत शिंदे या १५ वर्षीय मुलाच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यात त्याचा मृत्यू झाला, तर द्वारका भागवत शिंदे या जखमी झाल्या. परभणी तालुक्यातीलच साडेगाव शिवारातील बाबाजी केशव नाहातकर यांचाही वीज पडून दुर्दैवी अंत झाला.