विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
बारामती – बारामती परिसरात १ लाखांवर विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेतात, इथे विकासाच्या सुविधा असल्याने पहिली पसंती मिळते, मात्र इथल्या कायदा व सु्व्यवस्थेला नख लावण्याचे काम कोणी करीत असेल, ती कोणीही टुकार पोरं असली तरी मी त्यांना सोडणार नाही, आईबापांनी त्यांच्या पोरांच्या कृतीकडे लक्ष द्यावे असे अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामतीतील डॉ. अप्पासाहेब पवार उद्योग भवनच्या उदघाटनाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी बोलताना टवाळ पोरांना इशारा दिला आहे.
ते म्हणाले, बारामतीची ओळख शैक्षणिक हब म्हणून होत आहे. बारामतीच्या परिसरात एक लाख मुल मुली शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये वेडे वाकडे प्रकार करता कामा नये. जर कुठे फॅमिली बसली, मुली बसल्या आणि जर टुकार पोरांनी जर काही केलं, तर कुणाचही पोरगं असल तर मी सोडणार नाही.
पवार पुढे म्हणाले, मी आधीच तुम्हाला सांगतो. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या आपल्या मुलांना चार गोष्टी समजून सांगा. प्रत्येकाला बारामतीच्या परिसरात सुरक्षित वाटल पाहिजे. अजित पवारांनी हा इशारा देतानाच पोलिसांनाही सूचना केल्या आहेत.