गाडीमधील गॅसचा अचानक झाला स्फोट
सचिन पवार – महान्युज लाईव्ह
आज संध्याकाळी अष्टविनायक मार्गावर सुपे कडून मोरगारकडे निघालेल्या मारूती ओमणी कारमध्ये अचानक गॅसचा टाकीचा स्फोट झाल्याने पेट घेतला. सुदैवाने यात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र कारचे पूर्ण नुकसान झाले.
स्थानिक सुपे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुपे मोरगाव मार्गावर अहमदनगर परिसरातील ही मारुती कंपनीची ओम्नी गाडी नगर बाजूकडे निघाली होती. यावेळी अचानक गाडीने पेट घेतला.
गाडीतील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने गाडीने पेट घेतला , पोलिस पंचनाम्यानुसार गाडी पेटलेल्या ठिकाणी गाडीतील प्रवाशी गाडी सोडून पळाल्याने बचावले अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे फौजदार सलिम शेख यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सुपे व वडगाव निंबाळकर पोलिस करीत आहेत.