विक्रम वरे, बारामती.
बारामतीतील आरती एकाड पाटील यांनी नव्या पिढीतील पॉवरलिफ्टींग क्षेत्रात नाव कमवू पाहणाऱ्या युवतींसाठी मोठी खुशखबर दिली. ११ ते १२ मार्च पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला.
आरती यांनी पुण्यातील स्पर्धेत मास्टर -१ गटात (७६ वजनी गटात) २०० किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले. तर २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान जम्मू कश्मीर येथे झालेल्या फेडरेशन कप पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून चांगली कामगिरी केली.
आता एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी आरती पाटील भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आरती एकाड पाटील यांचे वय ४५ वर्षे आहे. या वयात आपला खेळ जोपासणे हेच खूप महत्वाचे आहे. त्यामुळेच आरती यांनी नव्या पिढीतील महिला खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.
त्या बारामती मध्ये पॉवरलिफ्टिंग खेळाचा प्रसार करीत असून प्रशिक्षिक म्हणून त्यांनी १५ वर्षे काम केले आहे. फक्त शिकविण्यापुरते मर्यादित न राहता, स्वतःच्या प्रकृतीसाठीही सतत खेळले पाहिजे असे त्यांना वाटले व त्यांनी सरावास सुरवात केली आणि यश मिळवले.