बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील बीबीए (सीए) विभागाने अँड्रॉइड अँप डेव्हलपमेंट या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील BBA-CA, MCS, BCA या विभागातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक राहुल शहा यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अँड्रॉइड अँप डेव्हलपमेंटसाठी लागणा-या सर्व बाबी प्रात्यक्षिकासह समजावून सांगितल्या. अॅप डेव्हलपमेंटसाठी विविध प्रोग्राम्सच्या मदतीने विध्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. तसेच या क्षेत्रातील विविध करिअर संधींची माहिती दिली.
कार्यशाळेच्या सुरवातीला महेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा असे सांगून विभागामार्फत भविष्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.भरत शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महाविद्यालयामार्फत जे जे विद्यार्थीपूरक उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी व आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा.
ही कार्यशाळा आम्हा विद्यार्थ्यांना आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच चालू शैक्षणिक वर्षात खूप छानप्रकारे उपयोगी पडेल असे मनोगत ऋतुजा जगताप, आकाश मोरे, अनुष्का सावंत व बोराटे कोमल या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेस उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, राहूल शाह,गजानन जोशी, महेश पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यशाळेला उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ.लालासाहेब काशीद यांचेही सहकार्य मिळाले. या कार्यशाळेतअनिल काळोखे समन्वयक होते. अंतिम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमा शेख यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विशाल शिंदे, अक्षय शिंदे,अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर व सतीश चौधर यांनी नियोजन केले.