बारामती – महान्यूज लाईव्ह
तक्रारदाराविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हजेरीची नोंद व तक्रारदाराच्या बाजूने तपासात मदत करण्यासाठी ९ हजारांची लाच मागितली म्हणून बारामती तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार प्रदीप दत्तात्रेय काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप काळे या हवालदाराने तक्रारदारास लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तेथे काळे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यावरून काळे यांनी ९ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर अधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने ही कामगिरी केली.