प्रदीप चोरगे मित्र परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन
दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
सध्या महीला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. आधुनिक युगातील कौशल्य आत्मसात करून मार्गक्रमण केल्यास प्रत्येक क्षेत्रात महिला ठसा उमठवू शकतात. महिलांनी सक्षम होऊन सर्व क्षेत्रात भरारी घ्यावी असे प्रतिपादन सुमनताई पाटील यांनी वाईत बोलताना व्यक्त केले.
गंगापूरी, वाई येथे प्रदीप चोरगे मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगरसेवक प्रदीप चोरगे, संगीता लोळे, शितल शिंदे, भावना गायकवाड, वासंती निंबाळकर, नीलम कदम, संयुक्ता देवकुळे आदी उपस्थित होत्या.
यावेळी शिवव्याख्यात्या सायली भोसले म्हणाल्या, आजच्या नारीने जिजाऊ, सावित्रींचा आदर्श घेऊन नवी पिढी घडवली पाहिजे. जिजाऊंनी दिलेल्या शिकवणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा सिद्ध झाले.
यावेळी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख, निलिमा सरकाळे, अनिता शिंदे, डॉ पद्मश्री चोरगे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रदीप चोरगे यांनी राबवत असलेल्या महिला सबलीकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी, डिनर शेट, फॅन, मिक्सर, टी. व्हीचे वितरण करण्यात आली. कार्यक्रमात वत्सला शिंदे, विमल चोरगे, विद्या काकडे, मालती तरडे, प्रमिला हगवणे, अग्निवीर प्रियंका जायगुडे, अवंतिका पोळ यांच्यासह २७ बचत गटांच्या अध्यक्षांचा, पालिकेच्या २७ महिला स्वच्छता कामगारांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन रवींद्र चोरगे, संजय जाधव यांनी केले. आभार अशोकराव सरकाळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रदीप चोरगे मित्र परिवार व गंगापुरी परिसरातील महिला उपस्थित होत्या.