सांगली – महान्यूज लाईव्ह
एकत्र कुटुंब वडीलधारी मंडळी जिवंत असतात, तोपर्यंतच चांगलं असतं.. खरंतर सामायिक विहीर हा सातबाऱ्यावरचा मुद्दाच आता निकाली निघाला पाहिजे.. कारण इगो, अहंकार आणि प्रतिष्ठेच्या या वादात आठवड्यात चारआणे किंवा दोन आणे असलेला हिस्सा कधी कोणाचा जीव घेईल याचा नेम नसतो.. महाराष्ट्राच्या सर्वच भागात शेतीच्या बाबतीत हा मुद्दा फार गंभीर बनत चालला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालु्क्यातील कोसारी गावात विलास नामदेव यमगर या ४५ वर्षीय चुलत्याचा व प्रशांत दादासाहेब यमगर या २३ वर्षीय पुतण्याचा विहीरीच्या पाण्याच्या पाळीवरून झालेल्या वादात जीव गेला.
यमगर कुटुंबाची एकच विहीर सर्वांच्या शेताला पाणी पुरवते. या विहीरीच्या पाण्यावरून भावकीत वाद झाला. तो एवढ्या टोकाला गेला की, १० ते १५ जणांनी केलेल्या हल्ल्यात विलास व प्रशांत यांची हत्या झाली.
याच भांडणात विजय यमगर, नामदेव यमगर, यशवंत खटके आदी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाची नोंद जत पोलिसांकडे झाली असून जत पोलिस पुढील तपास आहेत.