दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई – वाई येथील जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठस्तर वाई न्यायालयातील वाई वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. रमेश यादव, तर उपाध्यक्षपदी अॅड. महेश शिंदे यांची निवड झाली.
निवड झालेल्या दोन्ही वकिलांना वाई येथील जिल्हा न्यायालयाच्या संघटनेचेही पहिले अध्यक्ष, उपाध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. वाई वकील संघाची २०२३-२४ साठीची निवडणुक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत १८४ पैकी १६८ मतदारांनी सहभाग घेतला.
या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. रमेश यादव तर उपाध्यक्षपदी अॅड. महेश शिंदे यांची निवड झाली. तसेच सहसचिवपदी अँड. पराग वनारसे व खजिनदारपदी अँड. सागर संपत मोरे व सदस्यपदी अँड. शाहिन सिकंदर पिंजारी अँड. प्रद्युम्न गाढवे याची निवड करण्यात आली.
या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अॅड. राजीव मुळे व अॅड. सागर माेरे यांनी काम पाहिले. नवनियुक्त पदाधिकार्यांचे अँड उमेश सणस, अॅड. रविंद्र भाेसले, अॅड. संजय खडसरे, अॅड. राजेंद्र लाेखंडे, अॅड. श्रीकांत चव्हाण, अॅड. सुमन जाईकर, अॅड. मृण्मयी महांगडे, अॅड. मिलिंद देशपांडे, अॅड. जयंत गायकवाड, अॅड. साहेबराव बामणे, अॅड. प्रतापराव शिंदे, अॅड. शशिकांत हेरकळ तसेच सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले .