पुणे – महान्यूज लाईव्ह
पुणे व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा व राष्ट्रीय महामार्ग असलेल्या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्गाची आज केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी हवाई पाहणी करणार आहेत.
सकाळी साडेआठ वाजता नागपूरहून उड्डाण करून विशेष विमानाने ते पुण्यात येणार असून त्यानंतर पुण्यातून हेलिकॉप्टरने ते आळंदी, हडपसर, जेजूरी, लोणंद, धर्मपुरी, तोंडले, पंढरपूर अशी पाहणी करणार आहेत. या पाहणीत ते ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाची पाहणी करतील.
त्यानंतर पुन्हा पंढरपूर ते वाखरी, तोंडले, इंदापूर, बारामती, पाटस, हडपसर, देहू, पुणे शहर अशी हेलिकॉप्टरने परतीच्या प्रवासातून पाहणी करणार आहेत. यानंतर ते बारामतीतील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती दाखविणार आहेत.