बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीतील लघु पाटबंधारे खात्यातील अभियंता संदीप गोंजारी अडीच लाख रुपयांची लाच मागण्याच्या प्रकरणात अडचणीत आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारताना रणजित सूर्यवंशी या शिक्षकाला पकडले.
तक्रारदाराच्या भूसंपादन केलेल्या जमीनीचा वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात पाठविल्याप्रकरणी गोंजारी याने लाच मागितली होती. तडजोडीनंतर अडीच लाख रुपये लाच ठरली.
गोंजारीचा सहकारी असलेला शिक्षक सूर्यवंशी याला ही लाच स्विकारताना आज जळोची रस्त्यावर पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे,अप्पर अधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राम शिंदेस विरूनाथ माने, प्रविण तावरे, अभिजीत राऊत, सैरभ महाशब्दे यांच्या पथकाने पकडले.