दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : मागील पाच वर्षांत रस्ते,बंधारे कामांसाठी ४५० कोटी रुपये मंजूर झाले. सरकार आपले नसले तरी कर्तव्यात कसूर करणार नाही.वाई तालुक्यातील ११० गावांपैकी ९८ गावांत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत.मतदारसंघ विकास आणि विचारांनी बांधला आहे,असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
मांढरदेव, वेरूळी, डुईचीवाडी, सोमेश्वरवाडी, पालाना, अनपटवाडी व बालेघर गावांसाठी १६ कोटी,४६ लाख रुपये खर्चाच्या धोम धरणातून नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन खासदार श्रीनिवास पाटील,आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसन वीर सातारा साखर कारखानाचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, दिलीप पिसाळ, मदन भोसले, शंकरराव शिंदे,प्रल्हाद गाढवे, रामदास इथापे, विलास मांढरे मनीषा गाढवे, डॉ.मदन जाधव, केशव गाढवे, राजाबापू गाढवे, बाळासाहेब मांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.पाटील म्हणाले, माजी मंत्री मदनराव पिसाळ यांचे स्वप्न साडेसोळा कोटी रुपये खर्चाची पाणीयोजना व प्रत्येक गावात ७ लक्ष रुपये खर्चून मीनाताई ठाकरे पाऊस पाणी संकलन टाक्यांद्वारे हे शुद्ध पाणी घरोघरी पोहचविण्यातून पूर्ण होणार आहे. पाणी कधीच शिळे होत नाही. पाणी, वीज जपून वापरण्याचे व पिढीजात जमिनी न विकण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांपैकी राजेश शिंदे, डॉ.अशोक नायकवडी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कोणाही कार्यकर्त्यांने पक्षांतर केलेले नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, कृष्णेचे पाणी काळुबाईच्या डोंगर पठारावरील जनतेला देण्यातून मकरंद पाटील यांचे कर्तृत्व सिद्ध होते.जनतेने हाक मारावी. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस धावून जाते, म्हणूनच नागालँडमध्ये पक्षाचे ७ आमदार निवडून आले.
यावेळी प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, मोहन जाधव, सरपंच सीमा मांढरे, दत्तात्रय जाधव, विलास मांढरे यांची भाषणे झाली. शंकर मांढरे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सुनीता कळंबे, मोहन सूर्यवंशी, सतीश मांढरे, नामदेव हिरवे, खंडू मांढरे, भिकाजी जाधव,धर्माजी मांढरे, आनंदा शिंदे, संतोष जाधव, मुगुटराव कोचळे, अंकुश ढेबे, प्रकाश सूर्यवंशी, ओंकार क्षीरसागर यांनी स्वागत केले.उपसरपंच बापूराव धायगुडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास नितीन मांढरे, अंकुश कुंभार,जयसिंग जगताप, सतीश मांढरे, समाधान कदम,दत्तात्रय पवार, अनिल मांढरे,अविनाश गाढवे,शशिकांत मांढरे, लक्ष्मण कोंढाळकर,अंकुश जगताप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता डोईफोडे, ग्रामीण पाणी पुरवठयाचे उपअभियंता प्रशांत म्हात्रे,गिरीश गाढवे, संजय पाटील,बाळासाहेब सावंत, तुषार भिलारे, अनिल पोळ व शेंदुरजणे विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.