प्रदीप जगदाळे – महान्यूज लाईव्ह
नगरपरिषद, बारामतीचा महिला व बालकल्याण विभाग, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, भगिनी मंडळ, आणि बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्तिक विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज महिलांची भव्य सायकल रॅली झाली.

आज बुधवारी (दि. ८ मार्च २०२३) सकाळी ७ वाजता तीन हत्ती चौकापासून ही सायकल रॅली सुरू झाली. त्याची सुरुवात मुख्याधिकारी महेश रोकडे, माळेगावच्या मुख्याधिकारी स्मिता काळे व बारामती तालुक्याच्या वनपरीक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केली.


या रॅलीत अंदाजे १५० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला, सोबत पुरुष आणि मुलांनी सुद्धा मोठ्या संख्येने भाग घेतला असे एकूण २०० सभासदांनी या रॅली मध्ये घेतला. ही रॅली बारामती शहर बायपास रिंगरोड, शहरातील अंतर्गत रिंगरोड, भिगवण रोड, गुल पुनावाला गार्डन येथपर्यंत झाली.

सौ. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही रॅली पूर्ण करणाऱ्या सभासदांना बारामती नगरपरिषदेकडून स्वछतादूत, स्वछतामित्र प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याच कार्यक्रमात प्रतिभा अनिल दाते, डॉ. निता अनिलकुमार दोशी, लक्ष्मीप्रभा सतीश करे, सौ. योगिता राजन काळोखे, कु. राधिका संजय दराडे व माधवी मुळीक यांना आदर्श महिला म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी बारामतीच्या माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे याही उपस्थित होत्या. सुत्रसंचालन संगीता काकडे यांनी तर दीपा महाडिक यांनी आभार मानले.