बारामती महान्यूज लाईव्ह
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बारामती शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शारदा दराडे, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सुनीता मोठे, नलिनी पवार, वैशाली जगताप, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा देवकाते, प्रभावती ओव्हाळ, विजया महादेव काळे, ज्योती जाधव, माधुरीताई पडदळ, बबीता जगताप, सुरेखा गर्जे, आशा आटपाटकर, रेहाना शेख, वैशाली जगताप, वैष्णवी गायकवाड, अनिता माने, मंगलताई कुरले, नंदा आंबुळे, मनीषा नायडू, अनिता जगताप, उषाताई भोसले आदी महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.