नाशिक महान्यूज लाईव्ह
दिव्यांगांचा निधी खर्च न करणाऱ्या नाशिक महापालिका आयुक्तांवर हात उगारण्याची शिक्षा माजी मंत्री बच्चू कडू यांना चांगलीच मिळाली. कोर्टाने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा सुनावली.
सन २०१७ मध्ये हे प्रकरण घडले होते. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू हे नाशिक महापालिकेत गेले होते. तेथे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याबरोबर चर्चा करत असतानाच कृष्णा यांच्यासमवेत शाब्दिक चकमक उडाली व त्यानंतर राग आल्याने कडू हे कृष्णा यांच्यावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर हात उगारला.
त्यावरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून एका वर्षाची तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्यावरून १ वर्षाची शिक्षा नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.