अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : महिला दिनाचे औचित्य साधून उद्या बुधवारी (दि.८ मार्च) जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशन व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने इंदापूर महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात मोठ्या संख्येने मुली व महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.