स्मीअर पॅथॉलॉजी लॅबचा वर्धापन दिन व जागतिक महिला दिना निमित्त शिबीराचे आयोजन..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूरातील स्मीअर पॅथॉलॉजी लॅब या अत्याधुनिक व सुसज्ज लॅबचा प्रथम वर्धापन दिन व जागतिक महिला दिना निमित्त कर्तुत्वान महिलांचा सन्मान व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ.मेघा गायकवाड – अडसुळ यांनी दिली.
उद्या (८ मार्च) सकाळी साडेदहा वाजता बाबा चौकातील लक्ष्मीराज हाईट्स येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. या शिबिरामध्ये रक्तातील थायरॉईडचे प्रमाण, शुगरचे प्रमाण, रक्तातील हिमोग्लोबिन व पेशींचे प्रमाण, तसेच रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण याची तपासणी केली जाणार आहे.
या तपासणीसाठी खाजगी लॅबमध्ये हजारो रुपये खर्च येत असतो. उद्या हे शिबिर महिलांसाठी पूर्णपणे मोफत आहे. या तपासणीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.