दिल्ली महान्यूज लाईव्ह
सध्या सर्वत्रच ताप, खोकला, घसा, अंगदुखीचे रुग्ण आढळताहेत.. लहान मुलांमध्येही हे प्रमाण दिसतेय.. हा H3N2 विषाणू असू शकतो.. कोरोनासारखाच अतिशय वेगाने संसर्ग होणारा हा विषाणू असल्याने रुग्णांची संख्या वाढतेय
आयएमए ने यासंदर्भात नुकतेच संशोधन करून यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हा H3N2 विषाणू जोर धरू लागला आहे. एच १ एन १ या विषाणूसारखाच किंबहूना त्याचा पुढील प्रकार म्हणून H3N2 हा विषाणू असून १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सध्याच्या स्थितीत गर्दीची ठिकाणे टाळावीत. शक्यतो मास्क वापरावा व हात चांगले धुण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.