विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
एखाद्या चित्रपटामध्ये पाहिलेल्या हिरोला रस्त्यावर सहजासहजी भेटता येईल आणि तो हिरो स्वतःहून आपल्याशी बोलेल असा विचार स्वप्नातही सामान्य माणूस करणार नाही. सनी देओल त्याच्या फिल्म ‘गदर २’ च्या शूटिंगसाठी अहमदनगर येथे आहे. त्याच्या अनपेक्षित भेटीने एक शेतकरी मात्र चांगलाच सुखावला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय..
सांजवेळी शेतातील कामे उरकून घरी जात असताना चास गावातील भाऊसाहेब कार्ले या शेतकऱ्याला अचानक कोणीतरी थांबवलं. जिल्ह्यातील चास गावानजिक सनी देओल सांजवेळी फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळेस त्याची भेट रस्त्याने बैलगाडी मध्ये शेतातील कामे उरकून चाललेल्या या शेतकऱ्यासोबत झाली.
गावातील या शेतकऱ्याने आपल्याला रस्त्यावर अचानक अभिनेता सनी देओल भेटेल अशी कल्पनाही केली नसेल. त्यामुळे त्याने सनी देओल यांनाच हातात हात देऊन तुम्ही तर सनी देओल सारखेच दिसता! असे म्हटले. पण जेव्हा त्याला आपल्याला भेटलेली व्यक्ती सनी देओलच आहे हे कळलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.
भाऊसाहेबांनी आम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे व्हिडिओ मोबाइलवर पाहत असल्याचे सनी देओल यांना सांगितले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.