धुळे – महान्यूज लाईव्ह
अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरला.. आणि जीवघेणाही.. धुळे जिल्ह्यात अशी गारपीठ झाली की, काढणीला आलेली पिकेच जमीनदोस्त झाली..
तब्बल एक तास गारपीठ सुरू होती. धुळे जिल्ह्यातील खोरीटिटाने गावात झालेल्या गारपीठीने तेथील शेतकऱ्या्ंनाच जमीनदोस्त करून टाकले. या गारपिटीने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. काढणीच्या टप्प्यात आलेली गव्हाची, मक्याची, हरभऱ्याची पिके जमीनदोस्त झाली आहेत.
धुळे जिल्ह्यातील खोरी टिटणे भागासह निजामपूर, जैताणे आदी गावांमध्येही एक तास गारपीट सुरू होती. त्या गारपीटीने हायवे देखील जाम केला. गारा्ंचा साचलेला खच जणू खोरीटिटाणे गावाचे काश्मिर झाल्याचा भास तर निर्माण करीत होता. मात्र त्यापेक्षाही त्या गावातील शेतकऱ्या्ंची तुटलेली आर्थिक नाडी त्या गारांचा पांढरा रंग अधिकच भकास करून दाखविणारा ठरला.
राज्य सरकारने घेतली गंभीर दखल..
दरम्यान राज्यातील धुळे, नाशिक, नंदुरबार, नगर जिल्ह्यासह आसपासच्या भागातील अवकाळीची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली असून कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी संबंधित जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.