यवतमाळ – महान्यूज लाईव्ह
यवतमाळ जिल्ह्यातील ही बातमी अनेक गावांतील नव्या कंत्राटदारांसाठी व कार्यकर्त्यांमधून ठेकेदार होत असलेल्यांवर नजर ठेवणाऱ्या गावकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. यवतमाळमध्ये अचानकच जमीनीखालून नेलेली पाईपलाईन पाण्याच्या दबावामुळे फुटली आणि रस्ताच उडाला..
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
यवतमाळच्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. यवतमाळमधील माईंदे चौक ते अॅंग्लो हिंदी हायस्कूल रस्त्यावर हा प्रकार घडला. पाण्याचा दबाव एवढा वेगाचा होता की, जमीन १५ फूट उंच उडाली. तेथे मोठा खड्डा पडला आणि स्फोटासारखा आवाज झाला.
चापडोह पाणीपुरवठा योजनेची अनेक वर्षांची जुनी पाईपलाईन अचानक फुटली. एकीकडे नवी योजना म्हणून मंजूर झालेली अमृत पाणीपुरवठा योजना गेली पाच वर्षांपासून तारीख पे तारीख कामातच अडकून आहे आणि दुसरीकडे या जुन्या योजनेला ओझे सहन होत नाही असाच काहीसा प्रकार आहे.
अॅंग्लो हिंदी हायस्कूलपासूनच काही अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शुध्दीकरण केंद्र असून तेथील दोन पाणी टाक्यांमध्ये हे पाणी सोडणारी पाईपलाईन होती.