डॉ अजय दरेकर, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ बारामती
आंतरराष्ट्रीय रोटरीच्या परदेशी विद्यार्थी आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट आणि रोटरी क्लब बारामती यांनी संयुक्त विद्यमाने परदेशी विद्यार्थ्यांची भेट बारामती येथील प्रसिद्ध बारामती टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या भेटीसाठी आंतरराष्ट्रीय रोटरी कडून इरोहा सुई (जपान), पेड्रो हेरीरा मोलीना (स्पेन), ल वूरा डी (ब्राझील), गेब्रीएला नटाचा (फ्रान्स), फेलीप आरडीगोंडा सीलवा (ब्राझील), सिमोन मालींगर (फ्रान्स), ज्युलिया हरुमी (ब्राझील) विन्सेन्स ई मील (जर्मनी) यासीन कासिआ डि-सूझा (ब्राझील), वेरोनिका कोस्टा फरिआ (ब्राझील), हेनरी क्यू दि इलिया सेन (ब्राझील) अर्थूर फेरी इरा लीओ(ब्राझील) या पाहुण्यांनी सहभाग घेतला.
बारामती शहरातील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत इंग्लिश मीडियम , विद्या प्रतिष्ठानच्या विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर न्यू बाल विकास मंदिर पिंपळी सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूल एमआयडीसी या शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली.
बारामती टेक्स्टाईल पार्क मध्ये कॉटन किंग आणि इतर कंपन्यांना भेट देऊन कापडापासून विविध प्रकारचे कपडे तयार होण्यापर्यंत आणि ते परदेशी निर्यात करेपर्यंतची सर्व माहिती या विद्यार्थ्यांनी घेतली. कापड आल्यापासून कपडे तयार होण्यापर्यंतची आणि या कपड्यांची फिनिशिंग पासून पॅकिंग पर्यंत ची सर्व प्रक्रिया समजावून घेतली.
बारामती टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ आणि कॉटन किंगचे व्यवस्थापक श्री खंडू गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी परदेशी विद्यार्थ्यांना संपूर्ण टेक्सटाईल पार्क ची माहिती दिली. बारामती टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ कॉटन किंग चे व्यवस्थापक श्री गायकवाड, विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर चे श्री घोष, न्यू बाल विकास मंदिर पिंपळीच्या प्राचार्या कल्पना बारवकर, सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या यशस्विनी निगडे, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या राधा कोरे, अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलच्या राखी माथुर यांनी व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.
याप्रसंगी रोटरी क्लब बारामतीचे सचिव रो. अरविंद गरगटे, खजिनदार रो. रविकिरण खारतोडे, असिस्टंट गव्हर्नर रो. निखिल मुथा, युथ डायरेक्टर अलीअसगर बारामतीवाला, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या युथ डायरेक्टर रो. शोभा नहार, परदेशी विद्यार्थी युवक आदान प्रधान कार्यक्रमाच्या संचालक सारिका रोडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.