डॉ. अजय दरेकर, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ बारामती
आंतरराष्ट्रीय रोटरीच्या परदेशी विद्यार्थी आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट आणि रोटरी क्लब बारामती यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या भेटीच्या वेळी माळेगाव कारखाने ने केलेल्या पाहुणचारामुळे परदेशी विद्यार्थी भारावून गेले.
या भेटीसाठी आंतरराष्ट्रीय रोटरी कडून इरोहा सुई (जपान), पेड्रो हेरीरा मोलीना (स्पेन), ल वूरा डी (ब्राझील), गेब्रीएला नटाचा (फ्रान्स), फेलीप आरडीगोंडा सीलवा (ब्राझील), सिमोन मालींगर (फ्रान्स), ज्युलिया हरुमी (ब्राझील) विन्सेन्स ई मील (जर्मनी) यासीन कासिआ डि-सूझा (ब्राझील), वेरोनिका कोस्टा फरिआ (ब्राझील), हेनरी क्यू दि इलिया सेन (ब्राझील) अर्थूर फेरी इरा लीओ(ब्राझील) या पाहुण्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या विद्यार्थ्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या विविध विभागांना भेट देऊन सविस्तर माहिती घेतली साखर कारखान्यात ऊस आल्यापासून साखर तयार होण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया समजावून घेतली त्याचबरोबर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नाही भेट देऊन माहिती घेतली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, मुख्य केमिस्ट्री अधिकारी वाबळे, सहाय्यक केमिस्ट अधिकारी वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परदेशी विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रकल्पाची अतिशय सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, संचालक योगेश जगताप यांनी स्वागत केले. रोटरी क्लब बारामतीचे सचिव अरविंद गरगटे, खजिनदार रविकिरण खारतोडे, असिस्टंट गव्हर्नर निखिल मुथा, युथ डायरेक्टर अलीअसगर बारामतीवाला, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या युथ डायरेक्टर शोभा नहार व परदेशी विद्यार्थी युवक आदान प्रधान कार्यक्रमाच्या संचालक सारिका रोडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.