दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे नुकतेच भव्य फुले – आंबेडकर किक्रेट चषक २०२३ ही सर्वात मोठी स्पर्धा पार पडली. या मोठे क्रिकेट स्पर्धेत जी.वाय.सी. पावर्स या संघ या चषकाचा मानकरी ठरला. ही माहिती हा स्पर्धेचे आयोजक संदीप भागवत यांनी दिली.
कुरकुंभ पार पडलेल्या फुले -आंबेडकर किक्रेट चषक २०२३ या डे नाइट क्रिकेट सामन्यात परिसरातील १४ संघानी सहभाग घेतला होता. या १४ संघामध्ये ४९ सामने खेळवले गेले. या सामन्यात प्रथम पारितोषिक जी.वाय.सी. पावर्स या संघाने ३५ हजार रुपये बक्षीस पटकवले तसेच २५ हजार बक्षीस असलेले द्वितीय पारितोषिक हे श्रीराम क्रिकेट क्लब जिरेगाव या संघाने पटकावले.
तृतीय पारितोषिक हे गेम चेंजर्स या संघानी विजय मिळवला. चतुर्थ पारितोषिक रॉयल किंग झगडे वाडी यांनी पटकवले. तसेच मॅन ऑफ द सीरीज साठी फ्रिज हे बक्षीस ठेवण्यात आले होते. श्रीराम सी सी या संघाचा उत्कृष्ट खेळाडू ऋषी भंडलकर याला हा मान मिळाला. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व यष्टिरक्षक म्हणून गेम चेंजर्स या संघाचे किरण डांगे अभीतेश जैन व रोहित कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.
आयोजक संदीप भागवत, रोहित कांबळे, विकास कांबळे, अविनाश कांबळे, विशाल गायकवाड, बबलू शितोळे, फारुख शेख,अक्षय खंडाळे, सूरज साळुंके, सागर गायकवाड, सूरज कांबळे, अनिकेत भगत, मयूर भागवत,अतुल चव्हाण, अभीतेष जैन, अक्षय साळुंके, अविनाश साळुंके, निलेश कुंभार, अभिजीत शितोळे व चिराग भागवत आदींनी नियोजन केले.