सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : अधुनिक युगात पर्यटन व्यवसायाचा विकास व विस्तार वेगाने होत आहे. त्यामुळे फुड इंडस्ट्री या क्षेत्रात विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या नविन संधी निर्माण होत आहेत असे प्रतिपादन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फूड फेस्टिवलचे उद्घाटन राजवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील बोलत होते.
पुढील वर्षी यासारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्याबरोबरच शिक्षक आणि पालकांचा देखील सहभाग मोठा वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्याथ्यानी शिक्षणाबरोबर इतर कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.तसेच या आधूनिक युगात पर्यटन व्यवसायाचा विकास व विस्तार वेगाने होत आहे.त्यामुळे फुड इंडस्ट्री या क्षेत्रात विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या नविन संधी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक संस्था व त्यामध्ये राबविण्यात येणारे उपक्रम हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे म्हणाले की, फुड फेस्टीवल च्या निमित्ताने छोट्या व्यवसायातून उद्योगाच्या प्रेरणा विकसित व्हाव्यात. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव मिळावा, यासाठी हे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत.
या फूड फेस्टिवलमध्ये 59 स्टॉलधारक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जवळपास 80 ते 90 हजार रुपयांची उलाढाल झाली. ही माहिती या उपक्रमाचे आयोजक विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ. तानाजी कसबे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले.आभार डॉ. शिवाजी वीर यांनी मानले.