विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. गॅस सिलिंडरची दरवाढ ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरल्याने गॅस दरवाढीच्या विरोधात बारामतीमध्ये निषेध करण्यात आला.
बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे गुरुवारी चुलीवर स्वयंपाक करत केंद्राने केलेल्या गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, पक्षनिरीक्षक वनिता बनकर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, युवती अध्यक्षा आरती गव्हाळे,रेश्मा ढोबळे, सुनीता मोटे आदींनी सहभाग घेतला.
बारामती शहर प्रशासकीय भवन या ठिकाणी वाढती महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या युवती व महिलांनी मिळून गॅस सिलींडरची टाकी उलटी ठेवून व चुलीवर स्वयंपाक करून थाळी वाजवून आणि केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन आगळे वेगळे आंदोलन केले. महागाई कमी होण्यासाठी व आपल्या संसाराला दरवाढीची बसणारी झळ कमी करण्यासाठी सर्व महिलांनी मिळून बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन दिले.
या आंदोलनामध्ये बारामती शहरातील विविध ठिकाणच्या महिलांनी सहभाग घेतला होता.सुचित्रा साळवे, प्रियंका घोरपडे, प्रियांका चौरे, आशा आटपाडकर, पुष्पा देवकाते,संगीता पाटोळे, नुसरत इनामदार, विजया खटके, द्वारका कारडे, तसेच बारामती शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अविनाश बांदल सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्ष साधु बल्लाळ, बारामती शहर राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष विशाल जाधव इत्यादी उपस्थित होते.