दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाईत वीर जिवा महाले यांच्या उद्यानाचे काम संथगतीने सुरू आहे, ते वेगाने व्हावे व लवकरात लवकर पूर्णत्वास यावे अशी मागणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्र नाभिक महामंडळ संलग्न वीर जिवा महाले नाभिक संघटनेच्या पदाधिकारी व समाज बांधवांनी वाई येथील महागणपती मंदिरासमोरील नियोजित वीर जिवा महाले उद्यानाच्या कामाबद्दल निवेदन देण्यात आले.
वाई शहरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. कृष्णा नदीच्या पात्रापलिकडे सिध्दनाथवाडीच्या बाजूला नवीन उद्यान उभे रहात आहे. या नियोजित उद्यानाचे नामकरण ‘वीर जिवा महाले उद्यान’ असे करावे अशी मागणी शिवप्रेमी व नाभिक समाजाची होती. या वाईकरांच्या विनंतीला प्रतिसाद देवून वाई नगर परिषदेने सन २०११ मध्येच ठराव केला.
मात्र सध्या या उद्यानाचे सन २०१६ पासून कामकाज संथ गतीने सुरू होते. त्यानंतर काही कालावधीने काम पूर्णपणे स्थगित झाले आहे. त्यानंतर अगदी सन २०१९ पर्यंत यासंदर्भात वेळोवेळी समाजाच्या वतीने निवेदने देण्यात आली. मात्र सन २०१६ पासून दरवेळी दोन महिन्यांत, चार महिन्यांत काम पूर्ण होणार आहे. अशा बाबी सांगण्यात आल्या आणि वीर जीवा महाले उद्यानाचे काम आजपर्यंत पूर्ण झाले नाही.
यामुळे नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्या्ंनी आज पुन्हा यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष उमेश जाधव, अशोक सुर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष रमेश जाधव, तालुकाध्यक्ष संपत सुर्यवंशी, रवी क्षीरसागर वाई शहराध्यक्ष निनाद तावरे, सचिव सचिन तावरे, सुरेश जाधव, अर्जुन सुर्यवंशी खजिनदार विवेक तावरे, दिगंबर सुर्यवंशी, संघटक सुनिल तावरे, उपसंघटक शंभू सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष रमेश जाधव, संपर्कप्रमुख विजय सूर्यवंशी, अनिल पवार,सनी सुर्यवंशी, लक्ष्मण पवार, संतोष घाडगे, सागर सुर्यवंशी, संजय सुर्यवंशी, नाना सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, ओमकार सुर्यवंशी आदी उपस्थित होते.