पुणे – महान्यूज लाईव्ह
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनी पहिल्या फेरीपासून ठेवलेली आघाडी पाचव्या फेरीतही कायम राहीली, तर कसब्यात मात्र हायव्होल्टेज निवडणूक मतदानातूनही दिसून आली. पाचव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी ३ हजारांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीत रासने ४०० मतांनी आघाडीवर गेले होते. थोडक्यात पाचव्या फेरीत धंगेकर यांनी साडेतीन हजारांची आघाडी घेतली.
पुण्यात हाय व्होल्टेज निवडणूक झाली, त्याचे हे आकडे पहिल्या फेऱ्यांमध्ये दिसत आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये कसब्यात रविंद्र धंगेकर यांनी ५ हजार ८४४ मते घेतली, तर हेमंत रासने यांनी २ हजार ८६३ मते घेतली.
मात्र तिसऱ्या फेरीत हेमंत रासने यांनी ६०० मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर हेमंत रासने आघाडीवर पोचले आहेत. त्यांना ३ हजार ७०९ मते मिळाली. तर धंगेकर यांना ३ हजार ३० मते मिळाली.
चौथ्या फेरीअखेर रविंद्र धंगेकर यांना १४ हजार ८९१ मते तर हेमंत रासने यांना १४ हजार ३८२ मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर रविंद्र धंगेकर यांना साडेतीन हजार मते अधिक मिळाली. त्यामुळे रासने यांची चौथ्या फेरीतील आघाडी मोडून ते ३ हजारांनी आघाडीवर पोचले.
चिंचवडमध्ये एकतर्फी निवडणूक होईल असे चित्र दिसत होते. राहूल कलाटे हे निवडणूकीचे गणित बिघडवणार असे दिसत होते,. मात्र प्रत्यक्षात दोन फेऱ्यांमध्ये मिळून अश्विनी जगताप यांना ९०० मतांची आघाडी मिळाली. नाना काटे यांना ७ हजार २०६ मते तर अश्विनी जगताप यांना ७ हजार ८८२ मते मिळाली. राहूल कलाटे यांना २ हजार ६४५ मते मिळाली आहेत.
चौथ्या फेरीत अश्विनी जगताप यांना १६ हजार ५२२ मते तर नाना काटे यांना १३ हजार ५७५ मते मिळाली. राहूल कलाटे यांनी ५ हजार मते मिळवली. या चार फेऱ्यांचा कल पाहता कलाटे यांनी नाना काटे यांचे गणित बिघडवल्याचे स्पष्ट दिसत आहे.