पुणे – महान्यूज लाईव्ह
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप तर कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची आघाडी मोडून हेमंत रासने ६०० मतांनी आघाडी घेतली, मात्र भाजपच्या बालेकिल्ल्यातच रासने यांना अत्यल्प आघाडी मिळाली असून ती आघाडी पाहता रासने यांना अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत. आता चौथ्या फेरीअखेर रासने ४०० मतांनी आघाडीवर पोचले आहेत. चौथ्या फेरीत धंगेकर यांना ३ हजार ३० मते तर रासने यांना ३७०९ मते मिळाली. एकूण आघाडी ४०० मतांची झाली आहे.
पुण्यात हाय व्होल्टेज निवडणूक झाली, त्याचे हे आकडे पहिल्या फेऱ्यांमध्ये दिसत आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये कसब्यात रविंद्र धंगेकर यांनी ५ हजार ८४४ मते घेतली, तर हेमंत रासने यांनी २ हजार ८६३ मते घेतली. मात्र तिसऱ्या फेरीत हेमंत रासने यांनी ६०० मतांनी आघाडी घेतली. आता हेमंत रासने आघाडीवर पोचले आहेत. त्यांना ३ हजार ७०९ मते मिळाली. तर धंगेकर यांना ३ हजार ३० मते मिळाली.
चिंचवडमध्ये एकतर्फी निवडणूक होईल असे चित्र दिसत होते. राहूल कलाटे हे निवडणूकीचे गणित बिघडवणार असे दिसत होते,. मात्र प्रत्यक्षात दोन फेऱ्यांमध्ये मिळून अश्विनी जगताप यांना ९०० मतांची आघाडी मिळाली. नाना काटे यांना ७ हजार २०६ मते तर अश्विनी जगताप यांना ७ हजार ८८२ मते मिळाली. राहूल कलाटे यांना २ हजार ६४५ मते मिळाली आहेत.