दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
मेणवली (ता.वाई) येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेणवली आणी ग्लोरी चिल्ड्रन्स अकॅडमी मेणवली
यांच्या मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेणवली व ग्लोरी चिल्ड्रन्स अॅकडमी मेणवली या ठिकाणी निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अंगणवाडीतील लहान मुलांसाठी धावणे व चमचा लिंबु या सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
युवा उद्योजक तुकाराम जेधे, अनुपम जाधव (पाटील) सरपंच सौ. लक्ष्मी वेदपाठक. ग्रामपंचायत सदस्या सौ सुषमा चौधरी, पांडुरंग चौधरी, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष अक्षय निंबाळकर, जनाई एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर चौधरी, शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ. राधिका जाधव, तुलसीदास काटे, विजय काटे, युवराज चौधरी, संदिप वाईकर, समीर काटे, अजय वाईकर, प्रतिक हरचुंदे, संकेत हरचुंदे, अभिजित निंबाळकर, अक्षय काटे तसेच ग्रामस्थ, शिक्षक, अंगणवाडी सेविका कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
तुकाराम जेधे व मेणवलीच्या विद्यमान सरपंच सौ वेदपाठक यांनी मुलांना मार्गदर्शन केले व स्व. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचा वारसा जपत आज समाजात आमदार मकरंद पाटील तसेच नितीन पाटील हे समाजहितासाठी काम करीत आहेत याचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
शालेय समिती, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामार्फत आयोजकांचे आभार मानण्यात आले.