दौंड महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील व भिगवण च्या शिवेवर असलेल्या स्वामी चिंचोली येथील दत्तकला कॉलेज वर जाऊन तेथील सुरक्षा रक्षकांवर दादागिरी व शिवीगाळ करणाऱ्या पाटस येथील तीन तरुणांवर दौंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
सुयश संभाजी देशमुख, महेश मल्हारी गरदडे, समीर अनिल शितोळे (सर्व राहणार पाटस ता. दौंड जि. पुणे) अशी या तरुणांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हद्दीतील दत्तकला कॉलेजवर जाऊन या तिघांनी कॉलेज सुटलेले असताना सुरक्षारक्षक याला गेट उघडण्यास सांगितले.
यावेळी याठिकाणी सुरक्षारक्षक आनंद लक्ष्मण माने, तात्यासाहेब लक्ष्मण भालेकर, ज्ञानेश्वर शंकर गोळे यांनी आता कॉलेज सुटलेले आहे, आता आत जायचे नाही असे सांगितले. त्यांनी मी गेट उघडत नाही, असे म्हणाल्यावर या तिघांनीही सुरक्षारक्षक आनंद माने याला तू कुठला कोण? असे म्हणून तू गेट उघडतो की आम्ही गेट उघडू असे म्हणून गाडीतून खाली उतरून शिवीगाळ व दमदाटी केली.
याप्रकरणी आनंद लक्ष्मण माने याने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.