कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
अखेर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक फसवणूकीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करण्यासाठी ४० कोटी गोळा केले, सहकारी साखर कारखान्यासाठी पैसे गोळा करून स्वतःसाठी वापरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी विवेक कुलकर्णी यांनी केलेल्या या आरोपानंतर मुरगूड पोलिस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीच्या छाप्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता मुश्रीफ यांना अटक होणार का? याची चर्चा सध्या कोल्हापूरात सुरू आहे. मात्र मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुरगूड पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. हा मुश्रीफ यांच्यावरील पहिलाच गुन्हा असून त्यामुळे त्याची चर्चाही अधिक आहे, तर दुसरीकडे ईडीकडूनही त्यांच्याकडील कारवाईला वेग दिला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.