सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील पुणे- सोलापूर महामार्गावरील डाळज नंबर १ गावच्या नजिक मारुती स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात लातूर जिल्ह्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे झाला.
या घटनेत संदीप राजाभाऊ माळी (वय ३५ वर्षे), सरस्वती राजाभाऊ माळी (वय ६१ वर्षे, दोघेही रा. गातेगाव जि. लातूर) आणि बालाजी केरबा तिडके (वय ४८ वर्षे, रा. महावीर सोसायटी, लातूर) या तिघांचा दुर्दैवी अंत झाला.
आज (शुक्रवारी) पहाटे पावणेचारच्या सुमारास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कार (एमएच ४३ बीएन १४०२) पुण्याच्या दिशेने जात होती. डाळज गावच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटल्याने ती पलटली. कारमधील चालक संदीप व त्यांच्या आई सरस्वती यांच्यासह बालाजी ति़डके यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चंद्रकांत गवळी हे जखमी झाले.
या अपघातानंतर भिगवणचे फौजदार विनायक दडस, महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक अनिल पासगे, सहायक फौजदार कदम, पोलिस हवालदार उमेश लोणकर, अजित सरडे आदींनी घटनास्थळी अपघातग्रस्तांना मदत केली. जखमी व्यक्तीस भिगवण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवून दिले.