सामाजिक

अरे व्वा.. पवारसाहेब भाजप व राष्ट्रवादी पक्ष चालवतात तर..! बावनकुळेंचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.. राज ठाकरे यांचे कौतुक केले.. भाजपने उपमुख्यंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर अन्याय केला म्हणत नाराजीही व्यक्त केली..

१०५ आमदार असूनही भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून पहिला अपमान केला आहे – खासदार सुप्रिया सुळे

विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह

बारामती – खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. तर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर त्या म्हणाल्या, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा विचार केला, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पवारसाहेब चालवतात इतकी पवार साहेबांची ताकद आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या १०५ आमदारांबाबतचा निर्णय घेतात. हा आग्रह, विश्वास, प्रेम व पवार साहेबांची ताकद महाराष्ट्र व देशात असल्याचे कबूल केल्याबद्दल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे मी आभार मानते.

त्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर म्हणाल्या, सत्यमेव जयते म्हणजेच सत्याचा विजय होईल अशी आमची अपेक्षा आहे. कारण स्व:बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः घेतलेला निर्णय आहे. त्या मीटिंग ला राज ठाकरेही होते. सगळंच कुटुंब होतं. आणि मी तर खर राज ठाकरे यांचं मनापासून कौतुक करेल. त्यांचे जेव्हा मतभेद कुटुंबात झाले असतील. त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला. ते काय ओरबाडत बसले नाहीत. हे चिन्ह माझं, हा पक्ष माझा असे म्हणत राहीले नाहीत. अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

पण एका मराठी माणसाने पक्ष म्हणजे स्व:बाळासाहेब ठाकरेंनी काढलेला पक्ष एका मराठी माणसाकडे जातोय. हे कदाचित दिल्लीच्या तख्ाताला सहन होत नसेल.आणि मराठी भाषा मराठी अस्मिता मोडून शिवसेना संपवायचा कट कारस्थान हे महाराष्ट्राच्या विरोधात मराठी माणसाच्या विरोधात हे केंद्र सरकार करत आहे. हे त्यांच्या सगळ्याच वागणुकीवरून दिसतंय.

आज आपल्या नोकऱ्या नेतात. आपलं भीमाशंकर नेतात. शिवसेनेसारखा एक मराठी पक्ष आज ते मोडतायत. हे सगळे जे होते आहे हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठे षडयंत्र केंद्र सरकार करतंय असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांना भाजपशी युती हवी होती. मात्र मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस नको होते. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यावर प्रश्नावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे १०५ आमदार निवडून आले आहेत. तरीही देवेंद्र फडणवीस यांना का मुख्यमंत्री केले नाही? मात्र ४० आमदार असणाऱ्या गटाला मुख्यमंत्री पद देऊन खरंतर भाजपने पहिला अपमान देवेंद्र फडणवीस यांचा केला आहे. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी बारामती मध्ये दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या वक्तव्याचा विचार केला असता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पवार साहेब चालवतात इतकी पवार साहेबांची ताकद आहे.भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या १०५आमदारांबाबतचा निर्णय घेतात.हा आग्रह,विश्वास,प्रेम व पवार साहेबांची ताकद महाराष्ट्र व देशाला कबुल केल्याबद्दल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आभार मानते.असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांच्या सूचक विधानावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांना कल्पना होती तशी तुम्हालाही या शपथविधीची माहिती होती का? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवारसाहेबांनी कल्पना होती असं म्हटलंय का? मला माहिती नाही. मी वास्तवतेत जगते. मी भूतकाळात रमत नाही.

आज वास्तवता देशात आणि राज्यात काय आहे. सिलेंडर खूप महाग झालाय. आज कांद्याचा शेतकरी रस्त्यावर उतरलाय. त्याच्यामुळे भूतकाळात रमू शकतो आपण पण आज वास्तव काय आहे की आज महागाई आहे. आज बेरोजगारी आहे. आज सर्वसामान्य मायबाप जनतेला पोटचं दोन वेळेचं जेवण मिळत नाही. हे या राज्याचे आजचे वास्तव आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

tdadmin

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

1 day ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago