सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत १५ वर्षीय मतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला.या घटनेने इंदापूर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. नराधमास इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे.ही घटना सोमवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गागरगाव गावाच्या नजिक घडली.
या घटनेमुळे इंदापूर तालुक्यातील मुली महिला यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दत्तू नामदेव काळेल (रा. काळेल वस्ती, बिजवडी, ता. इंदापूर) असे या ४८ वर्षीय आरोपीचे नाव आहे. या संदर्भात पीडितेच्या आईने मंगळवारी (२१ फेब्रुवारी) इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या अनुषंगाने आरोपीवर भा.द.वि. ३७६, ३५४ अ आणि ३५४ ब कलमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील फिर्यादी, तथा पीडितेची आई देवदर्शनाला गेल्या असताना घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने पिडीतेवर बलात्कार केला. फिर्यादी देवदर्शनाहून परतल्यानंतर घराची आतून लावलेली कडी उघडत आरोपीने फिर्यादीला धक्का देत तेथून पळ काढला.
आरोपीने घरामध्ये प्रवेश केला. घराची कडी आतून लावत आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचे पिडीतेने आपल्या आईला सांगितले. या घटनेचा अधिक तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.