पुणे – महान्यूज लाईव्ह
बाकी काहीही चोरीला जातेय, म्हणजे सोने-चांदी, रोख रक्कम आता मुद्दा राहीलाच नाही..अगदी कलिंगड, खरबूज एवढेच काय गाईचे शेणदेखील चोरीला जातेय.. पण शेतातील उभा ऊस चोरायची अजूनपर्यंत कोणाची हिंमत होत नव्हती. आता चोरीचा नवा धंदा उसाने पाहिला, अर्थात त्याचं उदघाटन देखील चक्क कधीकाळी आमदारपद भूषवलेल्या व्हीआयपी माणसाच्या शेतातूनच झाली.
पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांच्या शेतातील साडेचार टन ऊस चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना थेऊर गावच्या हद्दीत घडली. या उसाची रक्कम आजमितीच्या दरानुसार १२ ते १३ हजार रुपये होत असून या प्रकरणी कुंजीर यांनी लोणीकाळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
१६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान हा फुले २६५ जातीचा ऊस चोरीला गेला आहे. याची माहिती झाल्यानंतर ७३ वर्षीय माजी आमदार कुंजीर यांनी पोलिसांत धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनीही त्यांची दखल घेत गुन्हा दाखल केला.