दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई, ता. 21 : सातारा जिल्हा महाविद्यालयीन प्रशासकीय सेवक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात किसनवीर महाविद्यालय वाईतील शिक्षकेतर 41 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत बेमुदत संप पुकारला आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सर्व कर्मचारी एकत्र येऊन हे आंदोलन करीत असून त्यांनी घोषणाबाजीही केली.
सातारा जिल्हयातील महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा विविध प्रलंबीत मागन्या घेऊन महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक कृती समिती तर्फे २ फेब्रुवारी २०२३ पासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलनास सुरूवात करण्यात आलेली आहे.
सन १९९४ पासून सुरू असणारी आश्वासित प्रगत योजना ७ डिसेंबर २०१८ रोजी शासनाने आध्यादेश काढून रद्द केलेली आहे. ती योजना इतर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे. परंतु फक्त महाविदयालीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी यांची चालू असलेली आश्वासित प्रगत योजना पुन्हा चालू झाली पाहिजे.
प्रत्येक महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ५० ते ६० टक्के पदे रिक्त आहेत, ती त्वरीत भरावीत. नोव्हेंबर २००५ नंतर सेवत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेशन योजना लागू करावी. शासकीय कर्मचाऱ्यांना प्रमाणे १०, २०, ३० टक्के लाभाची योजना महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करावी अशा या प्रमुख मागण्यासाठी कृती समितीच्या आदेशानुसार आंदोलनास सुरूवात झालेली आहे.
हे आंदोलन राज्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये सुरू आहे. वाईतही हे आंदोलन सुरू असून पुणे, सोलापूर, सातारा, नगर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातही या आंदोलनात शिक्षकेतर सेवक, कर्मचारी सहभागी झाले आहेत.