भोर महान्यूज लाईव्ह
पुणे सातारा रस्त्याच्या सेवारस्त्यावर खेडशिवापूर येथे मानसिंगराव कोंडे देशमुख यांच्या बंगल्यासमोर फायरिंग करून पेट्रोलपंपाची रक्कम लुटून नेण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दिपक शंकर जगदाळे (रा. गराडे, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली असून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास मानसिंगराव कोंडे देशमुख यांच्या बंगल्यासमोर हा प्रकार घडला. पेट्रोलपंपातील रोख रक्कम, कागदपत्रे, लायसन, एटीएम कार्ड मिळून ३ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लुटून नेली.
दुचाकीवर आलेल्या तिघांनी जगदाळे व त्यांचा जोडीदार कोळेश्वर आगारीया हे दोघे जेव्हा सोनल वाईन्स या दुकानांतील दारू विक्रीची ३ लाख ७८ हजारांची रोख रक्कम ही कोंडे देशमुख यांच्या पेट्रोलपंपावर नेत होते. तेव्हा पाठीमागून दुचाकीवरून येऊन जगदाळे व आगारिया या दोघांना दुचाकीला ठोस देऊन खाली पाडले.
या दोघांकडे असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न या चोरट्यांपैकी एकाने केला, तेव्हा त्यांना विरोध केला म्हणून कोळेश्वर आगारीया याचेवर चोरट्याने त्याचे जवळील पिस्तुलमधून दोन वेळा फायर केले व पिशवी चोरून नेली. या गुन्ह्याच पुढील तपास सहायक निरीक्षक नवसरे करीत आहेत.