दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
सातारा शहरालगतच्या सैदापूर येथील काळेवस्तीमध्ये एका घरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मटका खेळणार्या १९ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील मटका व जुगार व्यावसायिकांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या.
त्यानुसार देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरातील मटका व जुगार व्यावसायिक शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी हा त्याच्या काळेवस्ती सैदापूर सातारा येथील राहत्या घरामध्ये कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावाचा जुगार चालवीत असल्याचे समजले.
अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाला त्या ठिकाणी जाऊन मटका खेळणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मटका व्यावसायिक समीर सलीम शेख उर्फ समीर कच्छी हा त्याच्या १९ साथीदारांसह जुगार चालवत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
यामध्ये शमीम उर्फ समीर सलिम शेख उर्फ कच्छी (वय- ४२ वर्ष रा. काळेवस्ती, आंगणवाडी जवळ, सैदापूर, सातारा), धनंजय संपतराव कदम (वय ५५ वर्षे रा. ८९१ शनिवारपेठ सातारा), अश्विन विनायक माने (वय-४५ वर्ष रा. शेंद्रे, ता. जि. सातारा), नासिर हुसेन दिलावर शेख (वय-४० वर्ष रा.२२/२३ बुधवार पेठ सातारा), सलिम कादिर खान (वय-३५ वर्ष रा.६७२ शनिवार पेठ, सातारा) याच्यासह १९ जणांचा समावेश आहे.
६) शकिल कादर सय्यद वय ५१ वर्षे रा. २५९ शनिवार पेठ सातारा, ७) विष्णू काशिनाथ सोनटक्के वय ४५ वर्ष मुळ रा.कोरुचीमाळ बाग इचलकरंजी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर सध्या रा. काळेवस्ती, आंगणवाडी शेजारी, सैदापूर सातारा, ८) राजेश संपत कदम वय ५३ वर्ष रा.७७ पिलेश्वरी नगर करंजे सातारा, ९) विकास राजू चव्हाण वय ३० वर्ष रा.३०५ शनिवारपेठ सातारा,
१०) संतोष रामचंद्र माने वय ४६ वर्ष रा. कोंडवे ता.जि.सातारा, ११) अक्षय जोतिराम सोनावणे वय २१ वर्षे रा.मुजावर कॉलनी कराड, १२) गजानन चंद्रकांत इरकल वय ५१ वर्षे रा.४५ शुक्रवारपेठ सातारा, १३) किशोर दिलीप साळुंखे वय २६ वर्षे, रा. माळवाडी ता.जि.सातारा, १४) असद वाहिद सय्यद वय २७ वर्षे रा. जगदीश्वर कॉलनी सेदापूर, सातारा.
१५) असिफ बशीर खान वय ३८ वर्षे रा. ६७२, शनिवार पेठ सातारा १६) साहिल शमिम उर्फ समीर शेख उर्फ कच्छी वय १९ वर्षे रा. काळेवस्ती सैदापूर सातारा, १७) संतोष मोहन गुरव वय ३२ वर्षे रा.काशिळ ता.जि.सातारा, १८) प्रकाश तानाजी बोभाटे वय ३२ वर्षे रा.मुळीकवाडी ता. जि. सातारा, १९) श्रीकांत लक्ष्मण पाटील वय ६५ वर्षे रा.पाटखळ ता.जि.सातारा,, २०) अमर गणेश पवार वय २० वर्षे रा.गंगासागर कॉलनी मोळाचा ओढा सातारा यांचा समावेश आहे.