विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. त्यामुळे जेजुरीच्या सोमवती यात्रेला विशेष महत्व आहे. जेजुरी गडावर अनेक यात्रा उत्सव वर्षभरात होत असतात.पण सोमवती यात्रेला विशेष महत्व आहे.
सोमवती यात्रेच्यावेळी खंडोबाच्या उत्सव मूर्तीला कऱ्हा नदीत स्नान घातले जाते. नंतर गडावर नेऊन मूर्तीची विधीवत पूजा केली जाते. या दर्शन सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.खंडेरायाच्या दर्शनाला लाखो भाविक येतात.सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गडावर गर्दी केली आहे.
माघ अमावस्या या तिथीला द्वापारयुगादी अमावस्या असेही म्हणतात. यंदा माघ अमावस्या सोमवारी येत आहे आणि सोमवारी असणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हणतात. आज पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली. त्यामुळे जेजुरी गडाला सोन्याचं रुप आलं होतं.