वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे दुकानांचे मोठे नुकसान..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कुरवली गावात शॉर्टसर्किटमुळे सागर नारायण रुपनवर यांचे इलेक्ट्रिक अँड फर्निचर दुकान तसेच गणेश आबाजी जठार यांचे ऑटोमोबाईल्स व श्रीदत्त कृषी सेवा केंद्र यांच्या दुकानास शॉर्टसर्किटमुळे मोठे नुकसान झाले.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी या तिन्ही ठिकाणी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या या तिन्ही दुकानांचे पंचनामे त्वरित होण्यासाठी राजवर्धन पाटील यांनी प्रयत्न केला.
शॉर्ट सर्किटमुळे झालेले नुकसान मोठे आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन यावेळी दुकानदाराशी बोलताना राजवर्धन पाटील यांनी केले.