दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सकाळ चे बातमीदार अमरसिंह परदेशी तर उपाध्यक्षपदी लोकमतचे बातमीदार अमोल सातव, सचिवपदी अजय कांबळे व खजिनदारपदी रिझवान मुलाणी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.१९) दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाची बैठक दौंड पंचायत समितीच्या सभागृहात संघाचे उपाध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संघाचे सचिव राजेंद्र झेंडे यांनी मागील सभेचे वृतांत वाचन करीत सभेची सुरवात करीत नुतन कार्यकरणी निवड करण्याची सुचना मांडली.

या बैठकीत अमरसिंह परदेशी यांची अध्यक्षपदी तर अमोल सातव यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अमरसिंह परदेशी (अध्यक्ष), अमोल सातव (उपाध्यक्ष),अजय कांबळे ( सचिव), रिझवान मुलाणी (खजिनदार),अक्षय देवडे (सहसचिव), संदिप धुमाळ (सहखजिनदार), अनिल साळुंखे (प्रसिद्ध प्रमुख), विजय चव्हाण (शिस्तभंग समिती प्रमुख), दिनेश सोनवणे (समन्वयक), तसेच राजेंद्र झेंडे, आप्पासाहेब खेडकर जयवंत गिरमकर, विठ्ठल मोघे, तानाजी गावडे, अख्त्तर काझी, गोरख जांबले, तुकाराम कतुरे यांची कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली.

संघाच्या मार्गदर्शकपदी ज्येष्ठ पत्रकार मनोहर बोडखे, उमेश कुलकर्णी, प्रफुल्ल भंडारी, विजय चव्हाण, सावता नवले, अप्पासाहेब मेंगावडे यांची निवड करण्यात आली. संघाचे मावळते अध्यक्ष सावता नवले व उपाध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमरसिंह परदेशी, उपाध्यक्ष अमोल सातव यांच्यासह नवनिर्वाचित कार्यकारिणचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राजेंद्र झेंडे यांनी या सभेचे वाचन केले, तर उपस्थितांचे आभार आप्पासाहेब खेडकर यांनी मानले.
