शुभम अहिवळे, बारामती
बारामती दि.१९ : येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत. सामुदायिक त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले, सातसमुद्रापलीकडे जाऊन शिवरायांचा पोवडा गाणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि शिवरायांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेऊन भारतीय संविधानाची निर्मिती करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करणे देखील गरजेचे आहे आणि अशा प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, प्रा. वाघ, प्रा. रमेश मोरे यांनी केले.
या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे विकास खोत, प्रकाश टेमघर, सुषमा जाधव, माजी नगरसेविका अनिता जगताप, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, बिरजू मांढरे, वि.श्री कांबळे, ॲड. सुशील अहिवळे, बबलू जगताप, अरविंद बगाडे, नितीन शेलार, सुनील शिंदे, उत्तम धोत्रे, शैलेश सोनवणे, संजय वाघमारे, नितीन गव्हाळे, रवींद्र सोनवणे, चिऊशेठ जंजिरे, राजेश पडकर यांच्यासह अनेक तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे, शुभम अहिवळे, चेतन साबळे, कैलास शिंदे, सचिन जगताप, मनोज केंगार, चंद्रकांत भोसले, विश्वास लोंढे, गजानन गायकवाड, सोमनाथ रणदिवे, परीक्षित चव्हाण यांनी केले होते.