दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई – कोरोना कालावधीत मार्च 2020 मध्ये शासनाचे निर्बंध असताना महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा असलेल्या बावधन बगाड यात्रेचे नियोजन केल्याबद्दल गावातील सुमारे २०० ग्रामस्थांवर शासनाने गुन्हे दाखल केले होते. दोन महिन्यापूर्वी गावातील शिष्टमंडळ माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले, तेव्हा त्यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. याची दोनच महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मार्च २०२० मध्ये महाराष्ट्रातील कोरोनाच्या महामारीमुळे साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी विशेष खबरदारीचा उपाय म्हणून २०२० व २०२१ साली बावधनची बगाड यात्रा साजरी करू नये असे प्रशासनाने आदेश दिले होते.
असे असताना लोकभावनेचा आदर म्हणून प्रशासनाच्या नियमात राहूनच बावधन मधील ग्रामस्थांनी बगाड यात्रा साजरी केली होती. मात्र यामुळे बावधन मधील २०० ग्रामस्थांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. त्याचा ग्रामस्थांना विशेषतः विद्यार्थ्यांना शासकीय भरतीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय.
बगाड यात्रा साजरी करण्याने कोरोना फैलाव झालेला नसल्याने हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, अशा आशयाचे लेखी निवेदन माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली बावधन ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना दिले व गुन्हे मागे घेण्यासाठी विनंती केली होती.
त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाला त्वरित लेखी आदेश काढण्याच्या सुचना 2 महिन्यापूर्वी दिल्या होत्या. अवघ्या 2 महिन्यातच विशेष शासन आदेश काढून सगळ्या 200 ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेतले.
या संदर्भात विशेष शासन आदेशाने सगळे गुन्हे मागे घेतल्याचे आदेश न्यायाधीश आर एन भेंडे यांनी दिले. या प्रकरणी अॅड महेश शिंदे, अॅड विजय ठोंबरे, अॅड अर्जुन ननावरे, अॅड संजय खडसरे, अॅड राजेंद्र कदम, अॅड जयंत गायकवाड, अॅड संभाजी भोसले, अॅड रविंद्र भोसले ,अॅड विक्रम मेणबुदले,अॅड सागर मोरे, अॅड दिग्विजय ठोंबरे, अॅड सागर भोईटे, अॅड सुनील सणस, अॅड उर्मिला पाटील, अॅड शाहीन पिंजारी यांनी विनामोबदला सहकार्य केले.
विशेष आदेशाने गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.तर सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा सहाय्यक सरकारी वकील वैशाली पाटील, वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे खराडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सरकारी वकील स्वाती जाधव यांनी सहकार्य केले.
तर गुन्हे मागे घेण्यासाठी प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, किसनवीर कारखान्याचे माजी संचालक सयाजीराव पिसाळ, विक्रम पाटील, पंचायत समितीचे सदस्य दिपक ननावरे, वहिवाटदार चंद्रकांत भोसले, सुनील कदम, सचिन भोसले पाटील, राजेंद्र भोसले, बावधन ग्रामपंचायत सदस्य विवेक भोसले, विजयकुमार रासकर, तुषार पिसाळ, संतोष ननावरे, सुरज कदम, संदीप पिसाळ, भास्कर जाधव, अर्जुन कुंभार, तेजस मांढरे यांनी विशेष परिश्रम घेतले.